अराफात यांचा मृत्यू पोलोनियम विषानेच

झुरिच, दि ४ – फिलस्तीनचे माजी राष्ट्रपती यासर अराफात यांना २००४ साली त्यांना पोलोनियम विष देऊन मारले होते. स्वीर्त्झलँडच्या एका प्रयोगशाळेत झालेल्या चाचणीत याचा उलगडा झाला आहे. मंगळवारी अल-जजीराने या संबंधीत एक अहवाल सादर केला आहे. तथापि, अद्याप याची अधिकृत पुष्टी झालेली नाही.

युनिवर्सिटी ऑफ लुसेनमध्ये इंस्टीट्यूट ऑफ रेडिएशन फिजिक्सचे प्रमुख फ्रँक्वायस बोहुड यांनी अल जजीराला सांगितले की, पॅरिसच्या सैनिक रुग्णालयात अराफात यांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी सुहा यांना जैविक नमुने सोपवले होते. या नमुन्याच्या चाचणीत मोठ्या प्रमाणात रेडियो अॅक्टिव पदार्थ पोलोनियम  आढळून आले.

जवळपास चार दशकापेक्षा अधिक काळ वेगळ्या फिलस्तीन राज्याच्या मागणीसाठी लढत राहिलेले नोबेल पुरस्कार विजेते अराफात यांचा मृत्यू ११ नोव्हेंबर, २००४ साली झाला होता. गोपनियतेचा दाखल देत फ्रान्सच्या अधिकार्‍यांनी त्यांच्या मृत्यूचे अधिकृत कारण सांगितले नव्हते. आता जैविक नमुन्यांची अध्ययन केले असता निष्पन्न झाले आहे की, अराफात यांच्या मृत्यूचे खरे कारण त्यांना देण्यात आलेले पोलोनियम विष होते. या प्रकरणाची चौकशी होऊन अराफात यांना कुणी विष दिले हे समोर यायला हवे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.