स्वीम सूट माझ्यासाठी अनलकी – करिना कपूर

करिना आणि मधूर भंडारकर यांच्यासाठी ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या हिरॉईनचे आता शेवटचे शूटिंग सुरू असून त्याची जोरदार तयारी फिल्म सिटीत केली जात आहे. या ठिकाणी सिनेमाच्या टायटल साँगचे शूटिंग होत असून यात करिनाला स्वीम सूट घालायचा होता मात्र करिनाने त्याला साफ नकार दिल्याने पंचाईत निर्माण झाली आहे. या गाण्यात करिना वेगवेगळ्या २२ ड्रेसमध्ये दिसणार आहे मात्र त्यातून आता स्वीम सूट वगळणे मधुरला भाग पडले आहे.

करिनाचे या प्रकारात म्हणणे असे की तिला स्वीमसूटची अॅलर्जी वगैरे नाही पण तिच्या कंबक्त इश्क व तशन या दोन बिगबजेट चित्रपटात तिने स्वीम सूट घातला पण हे दोन्ही चित्रपट दणकून आपटले आहेत. त्यामुळे स्वीम सूट तिच्यासाठी लकी नाही असा समज तिने करून घेतला आहे आणि हिरॉईनवर तिच्या फार अपेक्षा असल्याने या चित्रपटाचे तसे कांही होऊ नये याची तिला काळजी वाटते आहे. म्हणून नो स्वीम सूट प्लिज !