व्हाटमोरला हवा आहे मिसबाह

पाकिस्तान संघाचे प्रशिक्षक डेव व्हाटमोरला ट्वेन्टी २० च्या विश्वचषक स्पर्धेसाठीच्या  संघात कर्णधार व वरिष्ठ खेळाडू असलेला मिसबाह  उल हक हवा आहे. त्यासाठी त्यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडे संभाव्य ३० खेळाडूच्या यादीत मिसबाहचे नाव समाविष्ट करण्याची मागणी केली आहे.

गेल्या काही दिवसापासून या संभाव्य यादीत मिसबाहचे नाव नसल्याची चर्चा ऐकावयास मिळत होती. ती चर्चा खरी ठरली असून या यादीतून मिसबाहचे नाव वगळण्यात आले आहे. त्याच्या जागी कर्णधार म्हणून मोहमद हफिज याची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे संघाचे प्रशिक्षक असलेले व्हाटमोर काहीसे नाराज असून त्यांनी निवड समितीकडे पुन्हा एकदा मिसबाहच्या नावाची शिफारस केली असल्याचे विश्वसनीय सूत्राकडून समजते. परिणामी पुन्हा एकदा निवड समितीसमोर पेच निर्माण झाला आहे.

श्रीलंका दौऱ्यावर जाण्यापूर्वीच व्हाटमोर यांनी निवड समिताला मिसबाचे नाव सुचविले होते पण त्यांनी या मागणीकडे दुर्लक्ष केले आहे. येत्या आठवड्यात ट्वेन्टी २० च्या विश्वचषक स्पर्धेसाठीची पाकिस्तान संघाच्या संभाव्य ३० खेळाडूची अंतिम यादी द्यावी लागणार आहे. त्यामुळे आता निवड समिती यामधून काय मार्ग काढते हे लवकरच समजेल.

Leave a Comment