आसाम – पूरग्रस्तभागाचा पंतप्रधान, सोनियांतर्फे दौरा

गुवाहाटी दि.२ – यूपीए’च्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी सोमवारी आसामच्या पूरग्रस्तभागाची हवाई पाहणी केली. त्यांच्या समवेत राज्याचे मुख्यमंत्री तरुण गोगोई होते.

या तिन्ही नेत्यांनी हेलिकॉप्टरमधून मजुली बेट, जोरहाट, शिवसागर, लखीमपूर आणि ढेमजी या पूरग्रस्त जिल्हयांची पाहणी केली. वरिष्ठ अधिकार्‍यांनी सांगितले की, काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाचीही ते हवाई पाहणी करतील, अशी अपेक्षा होती. हे उद्यान पुरामुळे पूर्णपणे जलमय झाले आहे.

तत्पूर्वी सकाळी ११ वाजता डॉ. सिंग आणि सोनिया गांधी यांचे नवी दिल्लीहून खास विमानाने जोरहाटच्या विमानतळावर आगमन झाले. पूरग्रस्त भागाची पाहणी केल्यावर उभय नेते गुवाहाटी येथे जाऊन मंत्री व प्रशासकीय अधिकार्‍यानशी राज्यातील पूरस्थितीच्या नुकसानीचा आढावा घेतला. व दुपार नंतर दिल्लीला रवाना झाले.