वॉशिंग्टन,दि. २ – अमेरिकेच्या एक न्यायालयाने फिरण्यासाठी आलेल्या भारतीय दाम्पत्याला दुर्घटनेची भरपाई म्हणून तीन कोटी ६४ लाख ८० हजार डॉलर (दोन अब्ज सात कोटी ९३ लाख ६० हजार रुपये) देण्याचा आदेश दिला. दम्पत्याच्या कारला एक १८ चाकी वाहनाने धडक दिली होती. अपघातात कारमध्ये बसलेले सर्वजण जखमी झाले होते. यात पत्नीची प्रकृती सर्वात जास्त गंभीर आहे. ती आता अंथरूणावरून कधीही उठू शकणार नाही.
मुंबईचा प्रकाश सेठ (६४) व त्याची पत्नी जयश्री सेठ (५८) दोन वर्षापूर्वी अमेरिकेला फिरण्यासाठी पोहचले होते. अपघातावेळी सेठ दाम्पत्य विमान उड्डाणसाठी ओरेंज काउंटीच्या विमानतळाकडे जात होते. यादरम्यान ब्यूमाउंटमध्ये इंटरस्टेट १० वर १८ चाकी वाहनाने त्यांच्या कारला धडक दिली. कारला सेठचे अमेरिकन नातेवाईक जॉन वेन चालवत होते. सेठची डगमगणारी कार एक बेरियरला जाऊन धडकली. याच वेळात आणखी एक वाहनाने त्यांच्या कारला धडक दिली. अपघातामुळे कारमध्ये बसलेल्या सर्व जणांना इजा झाली परंतु जयश्री सेठ गंभीररूपाने जखमी झाली. त्यांच्या पाठीचा हाड तुटले असून त्यांना पक्षाघात झाला आहे. त्यांच्या वकीलानुसार ती पूर्ण आयुष्य या अवस्थेत राहील.
हा अपघात १८ चाकी वाहनाद्वारे लेन बदलताना हलगर्जीपणाने वाहन चालवल्यामुळे झाला. उच्च न्यायालयाने १८ चाकी वाहनाची कंपनी शिडर नॅशनल्स कॉरपोरेटला सांगितले की, उपचार खर्च म्हणून चार लाख ६९ हजार ४९० डॉलर, ४८ लाख भविष्याचा उपचार खर्च, ६० लाख अपघातानंतर सहन केलेली वेदना व दोन कोटी २० लाख डॉलर भविष्याच्या दु:ख भरपाई स्वरूपात पीडीत दाम्पत्याला दिले जावे.