लठ्ठ होती समीरा

सध्या स्लिम ट्रीम दिसणारी समीरा रेड्डी एकेकाळी बरीच लठ्ठ होती. तिने स्वत:च हे गुपित सांगितले आहे. युटीव्ही स्टार्सच्या `द चोजन वन’ या कार्यक्रमात अँड गुरू प्रल्हाद कक्कर यांच्यासोबत समीरा सहभागी झाली होती. लठ्ठपणा कमी करण्यासाठी तिने दिलेल्या एका टास्कनंतर एक स्पर्धक रागावली आणि रडायला लागली, तेव्हा तिला समजावताना समीराने हे गुपित उघड केले.

एकेकाळी मीही खूप लठ्ठ होते. या लठ्ठपणामुळे बरीच निंदा मला ऐकावी लागली; पण निंदेमुळे मला शिकवण मिळाली आणि वजन कमी करण्यासाठी मी प्रयत्न केले. त्यामुळेच आज मी स्लिम आहे. वजन घटवताना तब्बेतीकडे दुर्लक्ष करू नका, असा सल्लाही समीराने दिला आहे.