अमिषा पाच चित्रपटांच्या चित्रीकरणात व्यस्त

कधी नव्हे ते अमिषा पटेलच्या झोळीत पाच चित्रपट आले आहेत. त्यामुळे सध्या ती प्रचंड बिझी आहे. सध्या तिच्याकडे `शॉर्टकट रोमियो’,  `रेस-२’ , `भय्याजी सुपरहिट’, `रन भोला रन’, `पॅराडाईड स्ट्रीट’, असे पाच चित्रपट आहेत. `रेस- २’ आणि `भय्याजी सुपरहिट’ च्या चित्रीकरणासाठी सध्या तिला सतत प्रवासात राहावे लागत आहे.

रेस-२ चे चित्रीकरण करून नुकतीच मुंबईत परतलेली अमिषा सध्या भय्याजी सुपरहिटच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. हे चित्रीकरण करून तिला पुन्हा इस्तांबूलला जायचे आहे. तेथून परतल्यानंतर एका शोमध्ये सहभागी होण्यासाठी अमिषा सुरतला जाणार आहे. अजून काही दिवस तिचा प्रवास असाच सुरू राहणार आहे; पण आयुष्यात प्रथमच आलेल्या या व्यस्ततेमुळे अमिषा मात्र खुश आहे.