
सतत कोणत्या ना कोणत्या चित्रपटाशी तारखांचा संघर्ष होत असल्याने बर्फी या चित्रपटाची तारीख तीन वेळा बदलण्यात आली होती. मात्र नव्याने ठरवण्यात आलेल्या फायनल तारखेमुळेही रणबीर कपूर आणि करीना कपूरच्या चित्रपट तारखेत टक्कर होणार आहे. या तारखेच्या घोळामुळे बहिण – भावातच आगामी काळात संघर्ष होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
