
मुंबई दि.२९ – यूपीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून प्रणव मुखर्जींना काल अर्ज दाखल केला खरा पण कळत नकळत त्यामुळे त्यांनी निराळेच संकट ओढवून घेतले असल्याची चर्चा राजधानीत सुरू झाली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे अर्ज भरताना बहुतेक सर्व पक्षांच्या नेत्यांना आमंत्रण देण्यात आले पण आपल्या साथीदारांविरोधात जाऊन प्रणवदांना पाठींबा देणार्या शिवसेनेला मात्र दुर्लक्षिले गेले. अर्ज भरताना काल शिवसेनेचा एकही नेता प्रणवदांच्या सोबत नव्हता आणि त्यामुळेच आता शिवसेना नाराज झाली असणार या भीतीने काँग्रेसला धडकी भरली आहे.
