
नवी दिल्ली दि.२७- पक्षाध्यक्षांचा आदेश झुगारून वडिलांचा प्रचार करणार्या अगाथा संगमा यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात यावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या युथ विंगने पक्षाध्यक्षांकडे आग्रह धरला असून अगाथा विरोधाची मोहिम अधिक तीव्र केली आहे. दरम्यान अगाथा यांना मंत्री पदाचा राजीनामा देण्याचा आदेश आज बुधवारी दिला गेला आहे.
