
इंदूर,२६जून-तीन वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार करून तिची निघृर्ण हत्या केल्याची घटना येथील मालवीय नगरात घडली. शिवानी फणसे असे या चिमुरडीचे नाव आहे. मालवीय नगरातील एका नाल्यात सोमवारी शिवानीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ मागली होती. लग्नाची वरात पाहण्यासाठी गेलेली शिवानी रविवारपासून बेपत्ता होती.
