राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान – अनुदानात कपात

नवी दिल्ली दि.२७- राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाअंतर्गत नियोजित उद्दिष्टपूर्ती न झाल्यामुळे देशातील बहुतांश राज्यांच्या अनुदानात कपात करण्याचे निर्देश केंद्र सरकारकडून बुधवारी देण्यात आले आहेत. देशातील आरोग्य निर्देशांक सुधारण्यासाठी केंद्राने हा निर्णय जाहीर केला आहे.
.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील अतिरिक्त सचिव व एनआरएचएम संचालक अनुराधा गुप्ता यांनी सांगितले की, देशातील आरोग्य विषयक सुविधांमध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी  राज्यांना देण्यात आलेल्या निधीमध्ये कपात करण्याची तरतूद प्रथमच करण्यात आली आहे. तसेच आगामी आर्थिक वर्षात कंत्राटावर घेण्यात आलेल्या डॉक्टर्स आणि नर्सना दुर्गम भागात सेवेसाठी पाठवण्यास प्राधान्य देणे आवश्यक आहे.त्यांना अतिरिक्त भत्ता देण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

प्रत्येक उप-आरोग्य केंद्र आणि सामुदायिक आरोग्य केंद्रात तैनात असलेल्या डॉक्टर्स आणि नर्सची माहिती वेबसाइटद्वारे लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे . मात्र अशा दुर्गम भागात डॉक्टर तसेच नर्सची नियुक्ती झाली नसल्यास राज्यांना देण्यात आलेल्या अनुदानात ७.५ टक्के कपात करण्यात येईल.

Leave a Comment