इम्रान खानने आतापर्यंत केलेल्या जाने तू या जाने ना, आय हेट लव स्टोरी व एक मै और एक तू या चित्रपटात शहरी चॉकलेट हिरोची भूमिका केली होती. आता तो यामधून बाहेर पडला असून गेल्या काही दिवसापासून तो देशी बॉय बनण्याचा प्रयत्न करत आहे.

आगामी काळात त्याचे दोन चित्रपट येत आहेत. त्या चित्रपटात तो देशी बॉय बनला आहे. चित्रपट दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांच्या मटरु की बिजली या चित्रपटात इम्रान एका हरियाणवी मुलाची भूमिका करीत आहे. तसेच मिलन लुथरिया यांच्या वन्स ऑपन अ टाईम इन मुंबई अगेन या चित्रपटात इम्रान टिपिकल टपोरी मुलाची भूमिका करीत आहे.
आतापर्यतच्या चित्रपटात इम्रानने शहरी मुलाची भूमिका केली आहे. मात्र आता त्याला पुढील काळात वेगळ्या स्वरुपाच्या भूमिका करायच्या आहेत. देशी बॉयची भूमिका करण्यासाठी त्याला कठोर मेहनत घ्यावी लागणार आहे. हरियाणवी मुलाची भूमिका करण्यासठी गेल्या काही दिवसापासून हरियाणवी भाषा येथील स्थानिक नागरिकाकडून शिकून घेत आहे. त्यामुळे आता आगामी काळात त्याची देशी बॉय ही नवीन भूमिका पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.