युवराज ने सुरु केला सराव

काही दिवसापासून कर्करोगाने त्रस्त असलेल्या युवराज सिंगने प्रदीर्घ विश्रातीनंतर पहिल्यांदाच फलंदाजीचा सराव केला आहे. त्यामुळे तो आता लवकरच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करेल याबाबत अशा पल्लवीत झाल्या आहेत. सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या २० ट्वेन्टी वर्ल्डकपमधून युवराज पुनरागमन करेल असे वाटते. 

युवराज सिंगने नुकतेच ट्विटरवरून  सोमवारी एनसीए मैदनावर फलंदाजीचा बऱ्याच दिवसानंतर सराव केल्याचे म्हटले आहे. सहा महिन्याच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर फलंदाजी करताना बरे वाटले असेही त्याने स्पष्ट केले. सध्या माझे लक्ष २० ट्वेन्टी वर्ल्डकप असणार असून त्याच्यावर मी माझे संपूर्ण लक्ष केंद्रित केले असल्याचेही त्याने सांगितले.

माझे शरीर हळूहळू पूर्वपदावर येत असून काही दिवसातच मी पूर्वीप्रमाणे फलंदाजी करू शकेन असा विश्वास त्यांने व्यक्त केला आहे. युवराज सिंगने आजारपणामुळे नोव्हेंबर २०११ पासून क्रिकेट सामना खेळलेला नाही. त्याच्यावर शस्त्रक्रिया झाल्याने तो सहा महिन्यापासून आराम करीत होता. २०११ च्या विश्वचषक स्पर्धेत युवराजने धडाकेबाज कामगिरी करीत भारतीय संघाला दुसऱ्यावेळीं विश्वचषक जिंकून दिला होता. त्यानंतर त्याला त्रास होत असल्याने उपचार करून घेत असताना त्याला कर्करोग झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्याच्यावर युवराजने विदेशात जाऊन उपचार घेतले होते. सहा महिन्यापुर्वी झालेल्या शस्त्रक्रियानंतर त्याला काही दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरानी दिला होता.

Leave a Comment