तीन-चार दिवसांत मान्सून सक्रीय – वेधशाळा

पुणे,  दि. २३ –  गेल्या आठवड्यात जोरदार मुसंडी मारत मान्सूनने कोकण, विदर्भाबरोबरच मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातही हजेरी लावली होती. पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या आहेत. या पावसाने शेतकर्‍यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र, या आठवड्यात पावसाने पूर्णत: दडी मारल्याने शेतकर्‍यांत चिंतेचे वातावरण आहे. दरम्यान, येत्या तीन-चार मान्सून पुन्हा सक्रीय होईल, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे.

प्रशांत महासागरातील चक्रीवादळ आणि चीनमधल्या तालिम वादळामुळे राज्यातील मान्सूनवर परिणाम झाला आहे. या वादळाच्या दिशा आणि वेगावर मान्सूनचा पुढील प्रवास अवलंबून असल्याचे पुणे वेधशाळेने सांगितले.