
मुंबई, दि. २२ – मंत्रालयाला गुरुवारी लागलेल्या आगीनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विरोधी पक्षांनी हे अग्निकांड म्हणजे एक कट असल्याचा आरोप केला. तर दुसरीकडे दादा-बाबा आमनेसामने उभे ठाकले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आगीवरुन संशय व्यक्त करताना मुख्यमंत्र्यांचेच कार्यालय सुरक्षित कसे राहिले, असा प्रश्न उपस्थित केला आहे.
