सैफ साकारणार चाचा नेहरू

भारत आणि पाकिस्तान फाळणीवर आधारित चित्रपटाची निर्मिती प्रसिद्ध चित्रपट निर्मात्या गुरिंदर चड्डा आगामी काळात करणार आहेत. यामध्ये भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची भूमिका सैफ अली खान करणार आहे.

या चित्रपटात त्याला चाचा नेहरुची भूमिका करावी लागणार असल्याने तो गेल्या काही दिवसापासून उत्साहित आहे. अशा स्वरूपाची वेगळी भूमिका करायला मला निश्चितच आवडेल अशी प्रतिक्रिया त्याने दिली आहे. तर मोहमद अली जीना यांची भूमिका अभिनेता नसिरुद्दीन शाहने करावी म्हणून त्याच्याशी सध्या बोलणी सुरु आहेत. काही दिवसातच तो या चित्रपटात काम करणार की नाही हे स्पष्ट होईल. भारत पाकिस्तान सबंधावर आधारित असलेला चित्रपट हे एक आव्हान असून ते पेलण्याचा प्रयत्न  करत असल्याचे मत गुरिंदर चड्डा यांनी व्यक्त केले.

 गेल्या काही दिवसापासून या चित्रपटाचे चित्रीकरणासाठी चड्डा  लोकेशन्सच्या शोधात आहेत. त्यानी दोन तीन जागेची निवड केली आहे. त्यापैकी राष्टीय भवन हे एक आहे. त्याठिकाणी चित्रपटाचे बरेचसे चित्रीकरण पूर्ण करण्यात येणार आहे. राष्ट्रीय भवन परिसरातील चित्रीकरणाला परवानगी मिळाली आहे. काही दिवसापासूनचे त्यांचे स्वप्न सत्यात उतरणार असल्याने सध्या चड्डा  खुशीत आहेत. त्याशिवाय हे चित्रीकरणाचे काम ऑक्टोंबर महिन्यापर्यंत पूर्ण करून चित्रपट प्रदर्शित करवा असे एका ज्योतिषांनी सांगितले आहे. त्यमुळे सध्या चड्डा  गडबड करीत आहेत.