जीवतोड मेहनतीनंतर अक्षयला मिळत होते फक्त साडेचार हजार रुपये

अक्षय कुमारच्या चाहत्यांना माहितच आहे की त्याचे खरे नाव हे राजीव हरीओम भाटिया असे आहे. भारतात ताइक्वांडोमध्ये ब्लॅक बेल्ट प्राप्त केल्यानंतर अक्षय मार्शल आटर्स शिकण्यासाठी थायलंडला गेला. येथे त्याने एका रेस्टॉरेंटमध्ये वेटर आणि शेफची नोकरीही केली. काही दिवसांनी मुंबईला परत येऊन अक्षय मार्शल आटर्स ट्रेनर बनला.

अक्षयचा एक विद्यार्थी फॅशन फोटोग्राफर होता. त्यानेच अक्षयला एक मॉडेलिंग असाइनमेंट मिळवून दिले. दोन तासांच्या फोटोशूटसाठी अक्षयला पाच हजार रुपये मिळाले होते. तर मार्शल आटर्सचे प्रशिक्षण दिल्यानंतर महिन्याकाठी अक्षयला साडेचार हजार रुपये मिळत होते. मॉडेलिंगच्या क्षेत्रात येण्यासाठी पैसे ही अक्षयची मोठी गरज होती. काही महिन्यानंतर निर्माता प्रमोद चक्रवर्ती यांनी अक्षयला त्यांच्या `दीदार’ या चित्रपटासाठी साईन केले. येथूनच अक्षयच्या खर्‍या करिअरला सुरुवात झाली. अक्षयने आपल्या करिअरमध्ये खिलाडी सिरीजचे आत्तापर्यंत सात चित्रपट केले आहेत. याच सिरीजचा आता आठवा चित्रपट `खिलाडी ७८६’ वर तो सध्या काम करत आहे.

Leave a Comment