आता अशियात सर्वात जास्त करोडपती

न्यूयॉर्क, दि. २० – आता सर्वात जास्त करोडपती अमेरिका किंवा युरोपमध्ये राहत नाही. मंदी व कर्ज संकटाची मार सहन करणार्‍या या महाद्वीपाने आपला ही प्रतिष्ठा गमावली आहे. यांच्या तुलनेत जास्त गतीने विकास करीत असलेल्या अशियात करोडपतींची संख्या आता सर्वात जास्त झाली आहे.

रिसर्च फर्म केपजेमिनी व आरबीसी वेल्थ मॅनेजमेंटच्या ताजा विश्‍व संपत्ती वृत्तानुसार वर्ष २०११ मध्ये जगभरातील दहा लाख डॉलर (सुमारे ५.६ कोटी रुपये) पेक्षा जास्त गुंतवणुक योग्य संपत्ती ठेवणार्‍यांची संपत्ती घटली आहे. यादरम्यान करोडपतींची संख्या ०.८ टक्के वाढून १.१ कोटी झाली परंतु त्यांची एकुण संपत्ती १.७ टक्के घटून ४२० खरब डॉलर झाली. तसेतर अशियामध्येही भारतात करोडपतींची संख्या गेल्यावर्षी सुमारे २० टक्केपर्यंत घटली आहे.