
इस्लामाबाद, दि. २० – पाकिस्तानचे पंतप्रधान गिलानींना मंगळवारी सुप्रीम कोर्टाने पदासाठी अपात्र ठरवल्यानंतर पंतप्रधानपदावर आता कोण? याबद्दल चर्चा सुरू झाली होती. यानंतर सत्ताधारी पाकिस्तान पिपल्स पार्टी (पीपीपी) ने मखदूम शहाबुद्दीन यांची पंतप्रधान पदासाठी निवड केल्याचे समजत आहे. पाकिस्तानी मीडियाच्या म्हणण्यानुसार पीपीपीच्या बैठकीत मखदूम शहाबुद्दीन यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे समजत आहे. मखदूम हे सध्या पाक सरकारमध्ये वस्त्र मंत्रालय सांभाळत आहेत. संसदेत आज औपचारिकरित्या मखदूम यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे.
