येरवडा कारागृहातील तीन कर्मचारी निलंबीत

पुणे, दि. २० –  इंडियन मुजाहिदीन संघटनेचा कुख्यात दहशतवादी मोहम्मद कातील सिद्दिकी याच्या खूनप्रकरणी येरवडा कारागृहातील दोन सुरक्षारक्षक आणि एका तुरुंगाधिकार्‍याला निलंबित करण्यात आले आहे. आर. अवघडे, एस. जाधवर व चंद्रकिरण तायडे अशी त्यांची नावे आहेत. यापूर्वी तुरुंगाधिकारी खटावकर यांना निलंबित करण्यात आले.

येरवडा कारागृहात अंडासेलमध्ये कारागृहाच्या खात्यांतर्गत चौकशीत सुरू होती. यामध्ये हे तिघेजण दोषी आढळून आल्याने ही कारवाई करण्यात आली. सिद्दिकी हा दिल्ली, बेंगलोर येथील बॉम्बस्फोटातील आरोपी होता. त्याने २०१० मध्ये दगडूशेठ गणपती मंदिर परिसरात बॉम्ब ठेवण्याचा अयशस्वी प्रयत्न केल्याने त्याला येरवड्यातील अतिसुरक्षा विभागात ठेवण्यात आले होते. कडक सुरक्षाव्यवस्था असताना त्याचा खून झाल्यामुळे कारागृह प्रशासनावर ताशेरे ओढण्यात आले आहेत.