जम्मू,दि. १९- पाकिस्तानी सैन्याने पुन्हा एकदा शस्त्रसंधी कराराचा भंग केला असून मंगळवारी जम्मू काश्मीरमधील पुछ जिल्ह्यातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ असलेल्या भारतीय चौकीवर गोळीबार करण्यात आला. गेल्या नऊ दिवसांमधील शस्त्रसंधीच्या उल्लंघनाची ही पाचवी घटना आहे.
पाकिस्तानी सैन्याने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील पुछ जिल्ह्यातील कृष्णघाटी येथील भारतीय चौकीवर सकाळी दहाच्या सुमारास गोळीबार केल्याची माहिती संरक्षण दलाचे जनसंपर्क अधिकारी कर्नल आर के पलटा यांनी दिली. पाकिस्तान सैन्याने तब्बल १५ मिनिटे गोळीबार केला. या घटनेत कोणीही जखमी झाले नसल्याचे त्यांनी सांगितले. पुछ जिल्ह्यातच गेल्या नऊ दिवसामध्ये पाकिस्तान सैन्याकडून नऊ वेळा गोळीबार करण्यात आला आहे. ११ ते १६ जून या कालावधीमध्ये पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबारात दोन जवान आणि चार जण जखमी झाले आहेत.
पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन
या उल्लंघनासंदर्भात भारताने पाकिस्तानकडे तक्रार दाखल केली असून दोन्हीकडील वरिष्ठ अधिकार्यांची बैठक बोलवण्याची मागणी करण्यात आली आहे.
