बिग बॉस-६ मध्ये दिसणार किम कार्दिशा

गेल्या काही दिवसापासून छोट्या पडद्यावर विविध रिअल्टी शो येत आहेत. त्यामुळे सध्या हे शो पाहण्याकडे प्रेक्षकाचा कल वाढत आहे. बिग बॉस या शोने आतापर्यंत पाच भाग पूर्ण केले आहेत. आतापर्यतचा त्यांचा प्रवास हा वादग्रस्त राहिला आहे. ऑगस्टमध्ये सुरु होणाऱ्या सहाव्या शोची सुरुवात आतापासूनच त्यानी सुरु केली आहे.  अमेरिकेतील प्रसिद्ध मॉडेल किम कार्दिशा ही या शो मध्ये सह्भागी होणार असल्याचे समजते. यामुळे या रिअल्टी शो मध्ये बरीच रंगत येणार आहे.

अमेरिकेतील प्रसिद्ध मॉडेल किम कार्दिशा ही शो मध्ये सहभागी होण्यासाठी ४.५ कोटी रुपये मागत असल्याचे समजते. तिच्या ह्या मागणीबाबत अजून विचार सुरु आहे. यापूर्वीच्या बिग बॉसच्या चौथ्या भागात प्रख्यात सुंदरी पामेला अन्डरसन ही काही काळ सहभागी झाली होती तर बिग बॉसच्या पाचव्या भागात पोर्न अभिनेत्री सनी लिओन ही सहभागी होऊन तिने पूर्ण कार्यक्रम गाजवला होता. त्यांच्या सह्भागामुळे बिग बॉसचे रेटिंग ही वाढले होते. त्यामुळेच या सीझन्साठी किम सहभागी व्हावी म्हणून प्रयत्न सुरु आहेत.

ह्या कार्यक्रमाचे मुख्य अधिकारी दीपक कुमार यांच्या मते बिग बॉस ६ मध्ये सहभगी होण्यासाठी आम्ही बऱ्याच सेलेब्रिटीशी संपर्क साधला असून त्यांनी अध्याप आम्हाला होकार कळवलेला नाही. त्यामुळे त्यांची नावे आताच सांगणे उचित ठरणार नाही. पण या कार्याक्रमाला पूर्वीपेक्षा कितीतरी अधिक प्रतिसाद मिळत असल्याचे त्यानी सांगितले.