गोलंदाजाला १२ ओवर देण्याचा कुंबळेचा सल्ला

पन्नास ओवरचा एकदिवसीय सामना अजून  रोमांचक करायचा असेल तर प्रत्येक गोलंदाजाला १२ ओवर टाकू देण्याचा सल्ला भारताचा माजी कर्णधार अनिल कुंबळे यांनी क्रिकेट नियामक मंडळला दिला आहे. काही दिवसापूर्वीच भारतातील सर्व माजी कर्णधाराची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये सर्वच माजी कर्णधारना मते मांडण्याचा अधिकार देण्यात आला होता.

यावेळी भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्या अनिल कुंबले यांनी भविष्य काळात एकदिवसीय क्रिकट सामने पूर्वीच्या तुलनेत अधिक प्रमाणात रोमांचक करण्यासाठी काही नवीन कल्पना सुचविल्या. त्यामध्ये कुंबळेने गोलंदाजाला  पूर्वी देत असलेल्या १० ओवरचा कोटा वाढवून १२ ओवर देण्यात याव्यात म्हणजे सामन्यातील रंगत पूर्वीच्या तुलनेत वाढेल अशी सूचना केली आहे. त्याचा फायदा गोलंदाजाला होणार आहे. त्याची ही सूचना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या तांत्रिक सामितेने स्वीकारली असून आगामी काळात त्याबाबतीत विचार करण्याचे आश्वासन ही यावेळी भारतीय क्रिकेट नियामक मंडळच्या पदाधिकाऱ्यांने दिले आहे.

त्यासोबतच रणजी स्पर्धेच्या सेमीफायनल व फायनलचा सामना चार दिवसाऐवजी पाच दिवसाचा करावा अशी सूचना ही अनिल कुंबले यांनी केली आहे. यामुळे रणजी सामन्याचे निकाल लागण्यास मदत होईल असे त्याचे मत आहे. त्यामुळे आगामी काळात त्याच्या या सूचनाचे पालन नियमक मंडळ करणार की नाही हे काही दिवसातच समजेल.

Leave a Comment