
नवी दिल्ली, दि. १९ – क्रीडामंत्री अजय माकन यांनी अखिल भारतीय टेनिस संघ (एआयटीए) च्या ऑलिम्पिकसाठी लियंडर पेस व महेश भूपतीची जोडी बनवण्याच्या निर्णयावर प्रश्न विचारला आहे. पेस व भूपती मतभेद असल्यामुळे पूर्वी देखील आपली जोडी तोडली असून माकन म्हणाले की, जेव्हा देश स्पर्धेसाठी दोन संघ पाठवू शकतो, तर फक्त एक संघ पाठवण्यावर जोर का दिला जात आहे. माकन यांनी सोशल नेटवर्किंग साइट ट्विटरवर आपल्या पोस्टमध्ये लिहिले, `आम्ही दोन संघ पाठवु शकतो तर मग एक का पाठवावे. प्रश्न हा आहे की, सानियासोबत जोडी कोन बनवेल. ग्रँड स्लॅम मिश्र दुहेरी जोडीला का छेडले जावे.’
