
फ्रँकफर्ट दि.१३- जर्मन वाहन उद्योगातील बड्या समजल्या जाणार्या ऑडी आणि बीएमडब्ल्यू या वाहन कंपन्यांनी चीनमध्ये आपल्या उत्पादनांची विक्री अपेक्षेपेक्षा अधिक केली आहे. चीनमध्ये या दोन्ही गाड्यांच्या विक्रीत अनुक्रमे ४४.२ आणि ३१.५ टक्के इतकी वाढ नोंदविली आहे. यामुळे युरोपातील कार मार्केटमध्ये असलेल्या मंदीमुळे सोसावे लागत असलेले नुकसान भरून निघाले आहेच पण या दोन्ही कंपन्यांनी मोठा फायदाही मिळविला आहे. वर्षभराच्या गाडी विक्रीचे उदिष्ट्य या दोन्ही कंपन्यांनी मे महिन्याच ओलांडले आहे.
