
अभिनेत्री ईशा देओल २९ जून रोजी विवाहबद्ध होणार आहे. व्यावसायिक भरत तख्तानीशी ती विवाह करणार असून, हा विवाह सोहळा एका मंदिरात पार पडणार आहे. या वृत्ताला ईशाची आई हेमामालिनी हिने दुजोरा दिला आहे. ईशा देओल आणि भरत तख्तानी यांचा साखरपुडा नुकताच झाला होता. हे लग्न जुहू येथील एका मंदिरात होणार आहे. लग्नासाठी मंदिरासारखी पवित्र वास्तू कोणतीही असू शकत नाही, असे हेमामालिनीचे म्हणणे आहे. ३० जून रोजी ग्रण्ड हयात हॉटेलमध्ये स्वागत समारंभ होणार आहे.
