‘थ्री इडियटस्’ साठी फरारी की सवारी

आमिर खान, शरमन जोशी आणि आर. माधवनची मुख्य भूमिका असलेल्या दिग्दर्शक राजकुमार हिरानीच्या थ्री इडियटसने बॉक्सऑफिसवर  इतिहास रचला होता. चित्रपटातील या तिघांची केमिस्ट्री कमालीची लोकप्रिय ठरली होती. आता हे तिघे जण लवकरच पुन्हा एकदा एकत्र येणार आहेत. `थ्री इडियटस’ नंतर शरमनने कोणत्याही चित्रपटात काम केले नाही. त्यामुळे फरारी की सवारी हा `थ्री इडियटस’ नंतरचा शरमनचा पहिला चित्रपट ठरला आहे.  तीन वर्षांच्या ब्रेकनंतर प्रेक्षकांसमोर येण्यापूर्वी काही खास लोकांनी आपला चित्रपट पाहावा, अशी शरमनची इच्छा आहे. या खास लोकांच्या यादीत आमिर आणि माधवन यांचा समावेश आहे.  शरमनची इच्छा आहे की या दोघांनी आपली प्रतिक्रिया सर्वप्रथम द्यावी.