एशिया मोटर्सच्या सेवा केंद्रांत वाढ

मुंबई, दि. ८ – व्यावसायिक वाहनांची उत्पादक असलेल्या एशिया मोटार्स वर्क्सने ग्राहक सेवा केंद्रांची संख्या १५०० पर्यंत वाढविली आहे. राष्ट्रीय महामार्गावर प्रत्येक ५० किमी. नंतर ग्राहकांसाठी सेवा केंद्र तत्पर असणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. यामुळे वाहनचालकांच्या वेळेची बचत होणार असून वाहनांची स्थितीही चांगली राहण्यास मदत होईल असे कंपनीच्या सूत्रांनी सांगितले.