
जागतिक मंदीचा तडाखा बहुतेक सर्व देशांना जिव्हारी बसत असतानाच या मंदीच्या चपेट्यात भारतासह आता चीन आणि दक्षिण कोरियाही येऊ लागले असल्याचे संकेत मिळू लागले आहेत. गेल्या कांही दिवसांत चीनचे औद्योगिक उत्पादन लक्षणीयरित्या घटले असून त्यामुळे गुंतवणूकदार धास्तावले आहेत असे समजते. मागच्या म्हणजे २००८ सालच्या जागतिक मंदीत भारत आणि चीन केवळ तरलेच नव्हते तर जागतिक अर्थकारणाला टेकू देण्याचे महत्त्वाचे कार्यही त्यांनी पार पाडले होते. यावेळी मात्र तशी परिस्थिती नाही असे अनुभवास येत आहे. चीनचा आर्थिक विकास दर दुसर्या तिमाहीत ७.९ टक्क्यांवर घसरेल असे अर्थतज्ञांचे मत असून तसे घडले तर २००९ नंतर प्रथमच चीनचा अर्थिक विकास दर ८ टक्क्यांच्या खाली येणार आहे. दक्षिण कोरियाचा निर्यात दर लक्षणीयरित्या कमी झाला आहे.
