सीरियामध्ये पुन्हा हिंसाचार ; १०० ठार

दमास्कस, दि. ७ – राष्ट्रपती बशर अल-असाद यांच्याशी एकनिष्ठ असलेल्या सैन्यांनी मध्य सीरियामधील एका खेड्यात १०० जणांची हत्या केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. मध्य सीरियामधील हामा प्रांतात असलेल्य अल-कुबैर या खेड्यात हे हत्याकांड घडले असून मरण पावलेल्यांत २० महिला आणि २० बालकांचा समावेश आहे, अशी माहिती विरोधकांकडून देण्यात आली.

सीरियामधील हौला या शहरात गेल्या २५ मे रोजी झालेल्या भीषण नरसंहारात १०८ लोक मरण पावले होते. त्या घटनेचे जगभरात तीव्र पडसाद उमटले होते. संयुक्त राष्ट्रांनी या हत्याकांडाचा तीव्र निषेध केला होता.