पाचव्या महापौर आंतरराष्ट्रीय बुध्दीबळ स्पर्धेला विदेशी खेळाडूंचा उत्तम प्रतिसाद

मुंबई, दि. ७ – पाचव्या महापौर आंतरराष्ट्रीय बुध्दीबळ स्पर्धेला सुरुवात झाली असून, या स्पर्धेत देश-विदेशातून तब्बल ३३५ बुध्दीबळपटूंनी भाग घेतला आहे.

देशातील बुध्दीबळपटूंनी पुढे यावी यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्या सामन्यात पुण्याच्या अतुल पेंडेला बेरारुसचा ग्रँड  मास्टर अलेक्सेज अलेकसांड्रोव्हचे आव्हान होते. आंतरराष्ट्रीय बुध्दीबळपटू बोरीस गेलफडने आक्रमक खेळ करीत अतुलचा पराभव केला. दरम्यान अतुलने अलेक्सेजला कडवी झुंज दिली. अतुलने २३ वी चाल चुकीची केल्यामुळे त्याचा फायदा अलेक्सेजला मिळाला आणि तो ३८ व्या चालीवर विजयी झाला.

दुसरीकडे रशियाचा अंड्रेव्ह देवीयात्कीणचस सामना होता प्रसाद औरंगाबादकरशी. त्यानेही बचावात्मक खेळ करीत खेळात रंगत आणली. सामना १७ व्या चालीच्यावेळी समान होता. प्रसादने सामना जिंकण्याची चिन्ह दिसताच अंड्रेव्हन केलेल्या नेत्रदीपक खेळाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

तिसर्‍या टेबलमध्ये वी. एम. राजीवला आव्हान होत निकोलाई चादेव या रुसी बुध्दीबळपटूचे. त्याने जग्गजेता बुध्दीळपटू विश्‍वनाथन आनंद सारखा खेळ करुन राजीवला शरणागती पत्करण्यास भाग पाडले.         

Leave a Comment