राजसूय यज्ञाची १३ जून रोजी सांगता

बार्शी, दि. ७ – बार्शीतील योगीराज वेद विज्ञान आश्रमात गेल्या पंधरा महिन्यांपासून राजसूय महायज्ञ सुरु असून, या राजसूय महासोमयागाची सांगता येत्या १३ जून रोजी होणार आहे. या राजसूय यज्ञाच्या अग्रपूजेसाठी प पू नारायणकाका महाराज व प पू. दादाश्री जाधव महाराज यांची निवड करण्यात आली आहे

गेल्या पंधरा महिन्यांपासून कासारवाडी येथील योगीराज वेद विज्ञान आश्रमात एकावेळी चार सोमयाग सुरु आहेत. त्यासाठी प्रत्येकी २८ ते ३० जण पौराहित्य करत असल्याचे आश्रमाचे प्रमुख नाना काळे यांनी सांगितले या अग्रपूजेस व यज्ञाच्या समाप्ती सोहळा परिसरातील विविध संत, महंत; तसेच मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरसंघचालक के सुदर्शन, संगणकतज्ज्ञ डॉ विजय भटकर यांच्यासह राज्यातील विविध राजकीय, सामाजिक व आध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत.