डॉ.सुदाम मुंडे यांना ३ जुलैपर्यंतची मुदत

मुंबई दि.६- परळीत एका महिलेचा अवैध गर्भपात करून तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या डॉ.सुदाम मुंडे आणि त्यांची पत्नी डॉ.सरस्वती यांना न्यायालयाने तीन जुलै ही न्यायालयात हजर होण्याची अंतिम मुदत दिली असून त्यामुदतीत ते हजर झाले नाहीत तर कायद्यानुसार त्यांची संपत्ती जप्त करण्यात येणार असल्याचे समजते.

विजयमाला पटेकर या महिलेचा गर्भपात करताना तिचा मृत्यू १८ मे रोजी डॉ.सुदाम मुंडे यांच्या रूग्णालयात झाला होता. त्यासंबंधी त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटकही करण्यात आली होती. मात्र त्यांची ताबडतोब जामीनावर सुटका करण्यात आली होती. डॉ.मुंडे यांच्या रूग्णालयात गेली कित्येक वर्षे स्त्रीभ्रूण हत्या होत असल्याचे आरोप केले जात होते मात्र दरवेळी त्यांच्याविरूद्ध कारवाई करण्यात अपयश येत होते. डॉ.मुंडे यांना या केसमध्ये जामीन मंजूर झाल्याबरोबर तेथील सामाजिक संस्थांनी त्यांचा जामीन रद्द व्हावा याासठी जोरदार आंदोलने केली होती. मात्र त्यापूर्वीच २२ मे रोजी मुंडे दांपत्य फरारी झाले होते. पाच राज्यांत त्यांचा शोध घेऊनही त्यांचा तपास अद्यापीही लागलेला नाही. ते नेपाळमध्ये गेले असावेत असाही अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Comment