
इंटरनेट व्यसनमुक्ती केंद्र हे वाचून सर्वांनाच मोठा धक्का बसला असेल, पण हे खरे आहे. भारतात अजून इंटरनेट व्यसन मुक्ती केंद्र सुरू झालेले नाही. मात्र अमेरिका, चीन आणि कोरिया या देशांत इंटरनेट वापरणार्यांचे प्रमाण अधिक असल्याने याठिकाणी अशा स्वरूपाची व्यसनममुक्ती केंद्र सुरू करण्यात आली आहेत.
