
नागपूर, दि. २- नक्षलवाद्यांनी १ ते ७ जून दरम्यान बंद पुकारला असून गडचिरोली जिल्ह्यात आपली दहशत कायम राहावी यासाठी नक्षलवाद्यांनी परत घातपाती कारवायांना सुरुवात केली आहे. एटापल्ली तालुक्यातील जराबंडी येथील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष गजानन मडावी यांच्यावर गोळ्या झाडून नक्षलवाद्यांनी त्यांची निर्घृण हत्या केली. ही घटना गुरुवारी रात्री घडली.
