
मुंबई, दि. १ – मुंबई – पुणे द्रूतगती महामार्गावर वारंवार होणार्या अपघाताच्या संदर्भात उपाययोजना सुचविण्यासाठी पोलीस अधीक्षक (महामार्ग) पुणे, राज्य रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता आणि परिवहन उपायुक्त या तिघांचा अभ्यासगट स्थापन करुन त्यांनी १५ दिवसांत अहवाल सादर करावा, अशा सूचना गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिल्या.
