
पणजी, दि. ३१ – दिगंबर कामत सरकारच्या काळात औद्योगिक विकास महामंडळाच्या भूखंडांच्या वितरणात झालेल्या भ्रष्टाचाराची पोलिसांमार्फत चौकशी करण्याचे संकेत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी दिले. राज्यातील विविध औद्योगिक वसाहतींमध्ये भ्रष्ट पध्दतीचा अवलंब करून अनेक भूखंड वितरीत करण्यात आले होते.
