
भारताचा ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद आणि इस्त्रायलचा बोरीस गेलफड यांच्यात सोमवारी मॉस्को इथे झालेली १२ वी फेरी सुध्दा बरोबरीत सुटली. त्यामुळे निर्णयासाठी टायब्रेकरनर आता विसंबून रहावे लागणार असल्याने आजच्या विश्रांतीनंतर दोन्हीही खेळाडू बुधवारी निर्णायक टायब्रेकरला सामोरे जातील. विश्वनाथन आनंद हा झटपट चाली खेळण्यात पटाईत समजला जातो, त्यामुळे गेलफडचेही त्याच्या या खेळावर नक्कीच लक्ष राहणार आहे.
