
‘रॉकस्टार’ चित्रपटामध्ये रणबीर कपूरची नायिका बनून बॉलीवूडमध्ये दाखल झाल्यानंतर दुसर्याच चित्रपटात अक्षयकुमारसोबत काम करायला मिळाल्याने नर्गीस फाक्रीचा आनंद गगनात मावेनासा झाला होता; पण तिच्या या आनंदाला कुणाची तरी नजर लागली. आगामी खिलाडी मध्ये अक्षयच्या नायिकेच्या रूपात नर्गीसला साईन करण्यात आले होते. मात्र, यातून तिची गच्छंती झाल्याचे समजते. या चित्रपटात बिग बी अमिताभ बच्चन नर्गीसच्या भावाची भूमिका साकारणार होते; पण प्रकृतीच्या कारणामुळे आणि बिझी शेड्यूलमुळे अमिताभ यांनी या चित्रपटातून अंग काढले.
