जर नशीब कोणावर मेहरबान असेल तर काय होउ शकते याची प्रचिती वारंवार चेन्नईला येत आहे. पहिल्यांदा नशिबाच्या जोरावर चेन्नईने प्लेऑफ लढतीत प्रवेश केला आणि आयपीएल स्पर्धतून परतीचे तिकिट हातात घेतले. याच चेन्नईचा दुसर्या क्वालिफायर सामन्यात सामना होईल तो पहिल्या क्वालिफायरमध्ये पराभूत झालेल्या दिल्ली डेअरडेव्हिल्सशी.
तसा कागदोपत्री दिल्लीचा संघ तगडा वाटतोय. पण पहिल्या क्वालिफायरमध्ये त्यांनी साफ निराशा केली. दिल्लीच्या संघात डेव्हिड वॉर्नर आणि विरेंद्र सेहवागसारखे स्फोटक फलंदाज आहेत. तर मधल्या फळीत रॉस टेजर फलंदाजी करण्यात अनुकूल आहे. दिल्लीचा मॉर्ने मॉकर्ल यंदाच्या हंगामात सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे. त्याला वरून एरॉन आणि उमेश यादव चांगली साथ देत आहेत. शुक्रवारच्या सामन्यात त्यांच्यावर मोठी मदार असणार आहे.
चेन्नईच्या संघाकडे पाहिल्यास मुरली विजय आणि मायकल हसी चांगली फलंदाजी करण्यास नेहमीच तयार असतात. महेंद्रसिग धोनी आणि ब्रावीने गेल्या सामन्यात चांगली फलंदाजी करत फॉर्मात येण्याचे संकेत दिले आहेत. गोलंदाजी डिपार्टमेंटध्ये रविद्र जडेजा, जकाती, मॉकर्ल आणि ऑस्ट्रेलियाचा हिल्फनहस तगडी कामगिरी करत आहेत. त्यामुळे शुक्रवारच्या सामन्यात ज्याचा खेळ सरस त्याच्याच हातात अंतिम सामन्याचे तिकिट पडणार हे नक्की