कंगणा राणावत झाली जखमी

बॉलीवूडमध्ये कायम करीत असताना जखमी होणे आता काही नवीन राहिले नाही. शुटिंग दरम्यान आतापर्यंत अनेक कलाकार जखमी झाले आहेत. त्यामुळे शुटिंग करताना खबरदारी घेणे महत्त्वाचे आहे. अभिनेत्री कंगणा राणावत नुकतीच शुटिंग करताना जखमी झाली.

‘शूट आऊट एट वडाला’ या चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान कंगणा राणावतला एक इंटरनेट सीन करायचा होत. त्यासाठी ती तयारही झाली होती. त्यावेळी जॉन अब्राहमच्या हातून तिचा हात जोरात दाबला गेल्याने हातातली बांगडी फुटून तिच्या हाताला लागली. यामुळे तिच्या हातातून रक्त वाहण्यास सुरुवात झाली. त्यामुळे काही काळासाठी चित्रीकरण थांबवावे लागले. काही  वेळातच डॉक्टने प्रथमोपचार केल्यानंतर ती ठीक झाली. नंतर तिने हातात काचेच्या बांगडीऐवजी सोन्याची बांगडी घालून ही जॉन इब्राहम सोबतचा सीन पूर्ण केला.

या चित्रपटात जॉन अब्राहमची प्रमुख भूमिका आहे. जॉनने या चित्रपटात अंडरवर्ल्ड डॉन दाऊदची भूमिका केली. सुरुवातीला तो साध्या सरळ युवक असतो मात्र त्याच्यावर अन्याय झाल्याने त्याला अंडरवर्ल्डकडे वळावे लागते, अशी त्याची भूमिका आहे. तर कंगणा राणावत ही गावातील साधारण मुलगी असते. मात्र ती कालांतराने जॉनच्या प्रेमात पडते. असे या चित्रपटाचे कथानक आहे.

‘शूट आऊट एट वडाला’ या चित्रपटात एकूनच ड्रामा, ऍक्शन, रोमान्स असे चित्र प्रेक्षकांना पहावयास मिळणार आहे. बर्‍याच दिवसांच्या विश्रांतीनंतर कंगणा या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येत आहे. तिला प्रेक्षक आता कशाप्रकारे स्वीकारतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Leave a Comment