रूपया घसरल्याने विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार अडचणीत

मुंबई, दि. २४ – रूपयाच्या अवमूल्यनाचा फटका केवळ सरकार व स्थानिक गुंतवणूकदारांनाच बसत नसून, शेअर बाजारातील महत्वाचा घटक असलेल्या विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांचेही (एफआयआय) चांगलेच हात पोळले आहेत. रूपयाच्या घसरणीने ‘एफआयआय’ चे बाजारातील नुकसान दुपटीने वाढले आहे. गेल्या महिनाभरात शेअर बाजार निर्देशांक सात टक्क्यांनी घसरला. दुसरीकडे रूपयाचे अवमूल्यन रोज नवनवीन विक्रम करीत असल्याचे दिसून येत आहे. शेअर बाजारच्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षभरात शेअर बाजार निर्देशांक १४ टक्क्यांनी घसरला. त्या तुलनेत डॉलेक्स (डॉलर आणि सेन्सेक्स) मध्ये तब्बल २८ टक्क्यांची घसरण झाली. डॉलरच्या समोर रूपया कमजोर होत असल्यामुळे डॉलेक्समध्ये मोठी घसरण होत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.