छोट्या पडद्यावरील यशस्वी अभिनेत्री म्हणून प्राची देसाईने चांगलेच नाव कमावले आहे. या छोट्या पडद्यावरील तिची कारकीर्दीमुळे तिने आता मोठ्या पडद्यावर एंट्री केली आहे. सुरुवातीच्या काळातच प्राचीला ‘वन्स ऑपन ए टाईम’ आणि ‘रॉक ऍण्ड रोल’ या चित्रपटात मिळालेल्या संधीचे सोने केले आहे.
छोट्या पडद्यावरील तिची भूमिका त्यानंतर प्राचीने सलमान खान, सैफ अलीखान व फरहान अख्तर सोबत जाहिरातीतून ती झळकली. यामुळेच तिला सुरुवातीला ‘वन्स ऑप ए टाईम इन मुंबई’ या चित्रपटात संधी मिळाली. त्यानंतर ‘रॉक ऍण्ड रोल’ मध्येही चांगली भूमिका मिळाली. हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलीच चालल्याने तिला सुरुवातीलाच यश मिळाले आहे.
गोलमालची कॉपी असलेला ‘बोल बच्चन’ या चित्रपटात अभिषेक बच्चन डबल रोल भूमिकेत दिसणार आहे. आता त्याच्यासोबत नायिका म्हणून प्राची झळकणार आहे. हा विनोदी चित्रपट असल्याने या चित्रपटात प्राचीच्या अभिनयाची कस लागणार आहे.
शहिद कूपर व प्राचीचा ‘तेरी मेरी कहानी’ या चित्रपटाचे शूटिंग सध्या सुरू असून या चित्रपटात प्राचीने ६० दशकातील स्वतंत्र स्त्रीची भूमिका केली आहे. शहिद व प्राचीची केमेस्टी चांगलीच जुळल्याने प्रियांका चोप्रा सध्या तिच्यावर नाराज आहे. कुणाल कोहली या चित्रपटाचे दिग्दर्शन करीत आहे. प्राचीची ‘वन्स ऑपन ए टाईम इन मुंबई’ व ‘रॉक ऍण्ड रोल’मधील भूमिका पाहिल्यानंर या चित्रपटात संधी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून प्राचीने बॉलीवूडमध्ये सावकाश सावकाश जब बसवित आहे. आगामी काळात प्राची या अभिनयाच्या जोरावर बॉलीवूडमध्ये जम बसवित असून ती एक यशस्वी अभिनेत्री म्हणून नाव कमवेल असे वाटते.