सायकली महागणार

मुंबई, दि. २४ – डॉलरच्या समोर अवमूल्यनाचे विक्रम नोंदविणार्‍या रूपयाचा फटका गरिबांची मोटरसायकल असलेल्या सायकलींनाही बसला आहे. डॉलरचे मूल्य वधारत असल्यामुळे आयात करण्यात येणार्‍या सायकली व त्यांच्या सुटया भागांसाठी आयातदारांना जास्त पैसे मोजावे लागत आहेत. त्यामुळे त्यांनी पाच टक्के भाववाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. आयात करण्यात येणार्‍या सायकलींच्या किंमती वाढविण्याशिवाय आमच्यासमोर कोणताच पर्याय नाही. यामुळे पुढच्या १०-१५ दिवसांमध्ये या सायकलींच्या किंमती पाच टक्क्यांनी वाढलेल्या असतील, असे सोवरेनचे व्यवस्थापकीय संचालक रोहित कार्ला यांनी सांगितले. तैवान, चीन व थायलंड येथून सायकली व सायकलींचे सुटे भाग आयात केले जातात. रूपयामध्ये होत असलेल्या घसरणीमुळे मार्चपासून या सायकलींच्या किंमती १५ टक्क्यांनी वाढल्या आहेत.