मुंबई, दि. २१ – राज्य सरकारने २००२ साली पाणी समस्येवर मात करण्यासाठी नवीन इमारती उभारताना रेन वॉटर हार्वेस्टिंग योजना राबविण्याची सक्ती करूनही आत्तापर्यंत ६ हजार ८५५ इमारतींपैकी ३ हजार ८ इमारतींमध्ये योजना राबविण्यात आली. मात्र, खुद्द महापालिकेच्या १२ इमारतींसह ३ हजार ७५५ इमारतींमध्ये आतापर्यंत रेन वॉटर हार्वेस्टिंग योजनेची अमंलबजावणीच केलेली नाही. मात्र, पालिकेने त्यांच्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही.
रेन वॉटर हार्वेस्टींग योजना राबविणार्यांना मालमत्ता करात सवलत
मात्र, यापुढे ज्या इमारतींमध्ये ही योजना राबविली जाईल त्या इमारतींना पालिकेच्या नवीन मालमत्ता करात सवलत देण्यात येईल, अशी माहिती महापौर सुनील प्रभू यांनी दिली. महापालिकेच्या २०९ पैकी १९७ इमारतींध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग योजना राबविली तर १२ इमारतींमध्ये ती राबविण्यात आलेली नाही.
