रेव्ह पार्टी प्रकरणात मी दोषी नाही – राहुल शर्मा

जालंधर, दि. २१  – आयपीएल स्पर्धेतील पुणे वॉरियर्स संघातील राहुल शर्मा आणि दक्षिण आफ्रिकन खेळाडू वेन पार्नेल यांना जुहू येथे झालेल्या रेव्ह पार्टीत टाकलेल्या धाडीत अन्य ९४ जणांसह ताब्यात घेण्यात आले होते. त्यांचे आज रक्त आणि मुत्राचे नमुने घेतल्यानंतर सोडण्यात आले. ओकवूड प्रिमिअर हॉटेलचे संचालक विषय हांडा यांना याप्रकरणी अंमली पदार्थ विरोधी कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली आहे. मुंबईतून सोडल्यानंतर जालंधरमधल्या आपल्या घरी पोहचल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत राहुल शर्मा म्हणाला, जालंधरला जाण्यासाठी पुणे येथून आपण निघालो असताना मी मुंबईला थांबलो होतो. त्यावेळी मुंबई येथील एका हॉटेलमध्से मी माझ्या मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलो. त्यानंतर पोलिस तिथे आले आणि त्यांनी आमची तपासणी केली. इतरांबरोबर आम्हालाही रेव्ह पार्टीत अंमली पदार्थ घेतली आहे की नाही या तपासणी करीता रूग्णालयात नेण्यात आले. आरोग्य तपासणीचा अहवाल उद्यापर्यंत येणे अपेक्षित आहे. राहुल यावर म्हणाला की, जर तपासणीत मी दोषी आढळलो तर मी क्रिकेट सोडून देईन.

Leave a Comment