
जळगांव दि.२१- जळगांवचे पालकमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार गुलाबराव देवकर यांना कोट्यावधी रूपयांच्या घरकुल घोटाळा प्रकरणी आज सकाळी बाराच्या सुमारास अटक करण्यात आली. त्यांची वैद्यकीय तपासणी करून दुपारी त्यांना जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे जळगांवचे पोलिस निरीक्षक इंगवले यांनी सांगितले.
