
मुंबई ,दि. २१ – इंडिया टुडे समूहातील लिव्हिंग मीडिया इंडिया लिमिटेड या कंपनीत गुंतवणूक करण्याचे आदित्य बिर्ला समूहाने ठरविले आहे. ही गुंतवणूक समूहाच्या खाजगी गुंतवणूक कंपनीतर्फे होणार असल्याचे आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष कुमारमंगलम बिर्ला यांनी सांगितले. प्रसार माध्यमाचे क्षेत्र हे सतत विस्तारणारे क्षेत्र आहे. त्यामुळेच या क्षेत्रातील लिव्हिंग मीडिया या कंपनीत गुंतवणूक करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. आदित्य बिर्ला समूहाच्या या गुंतवणुकीमुळे समाधान वाटल्याचे इंडिया टुडे समूहाचे अध्यक्ष अरूण पुरी यांनी म्हटले आहे.
