मुंबईतील गे चित्रपट महोत्सवातून समलैंगिकांना न्याय मिळेल – रेणुका शहाणे

मुंबई, दि. १८ – समलैंगिक लोकांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन बदलण्यासाठी मुंबईत आयोजित गे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव म्हणजे एकप्रकारे समलैंगिक लोकांना न्याय देण्यासारखे आहे, असे मत प्रसिद्ध सिनेअभिनेत्री रेणुका शहाणे यांनी व्यक्त केले आहे. त्या प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होत्या.
    या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वच क्षेत्रातील नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही रेणुका शहाणे यांनी केले आहे. या चित्रपट महोत्सवात मराठी चित्रपटांसह जगातील १२० चित्रपटांच्या माध्यमातून समलैंगिकांचे प्रश्‍न, त्यांच्या समस्या मांडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. २३ ते २७ मे या कालावधीत मरीन लाईन्स येथील अलायन्स फ्रेंचाईजी व सिनेमॅक्स वर्सोवा येथे हा महोत्सव साजरा केला जाणार असल्याचे आयोजक विवेक आनंद यांनी सांगितले.